Monday, February 11, 2008
नाव सुचवावे. .....?
माझ्या ह्रुदयाची स्पंदने ऐकशील का?
हे तडपणारे कळिज पहिशील का?
प्रत्येक स्पंदन तुझ्यासाठिच धडधडते
हे कळिज फक्त तुझ्यासाठिच फडफडते
माझ्या डोळ्यात नजरे भिडवशील का?
या ओठांवर ओठ मिट्वशील का?
डोळ्यात प्रतिबिंब तुझेच प्रिये
ओठांवर नाव नेहमी तुझेच प्रिये
माझ्या जीवनात तु येशील का?
या श्वासात विलिन होशिल का?
इथे आपल्या निर्मळ प्रेमाचे वाहते झरा
वटल्यास सत्व परीक्शा घेऊन बघ जरा
हा हात हातात घेशिल का?
आजीवन साथ निभावशिल का?
धरलेला हात सोडणार नाही मी
केलेल्या प्रेमाची लाज ठेवेन मी
फक्त , ' तू अन मी ' जाणे.. ...
गार वारे असे वाहले,
भाव का गारठले ?
कुणी न जाणे..
पण , शहारे का गारवा देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
बहर वॄक्षांना मग फुलले,
पर्ण का गळाले ?
कुणी न जाणे..
पण , मनास का पालवी देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
वैशाख वणवे तेव्हा पेटले,
ह्रदय का होरपळले ?
कुणी न जाणे..
पण , वणवे का ऊब देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
नभी मेघ दाटून आले,
नयनांत का उतरले ?
कुणी न जाणे..
पण , पूर का तहान देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
परत ,
वाहले वारे सुखाचे,
फुलले बहर प्रेमाचे,
पेटले वणवे विरहाचे,
दाटले मेघ दु:खाचे..
ॠतु जीवनी असे आले,
श्वासांत का मिसळले ?
कुणी न जाणे..
पण , ऋतु प्रेम शिकवून गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
' तू अन मी ' जाणे..
एकट असाव अस वाटत ..
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत
अवती भोवती रान सगळ
मुक मुक असत
वाट दिसु नये ईतक
धुक धुक असत
झाडाखाली डोळ मिटून बसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत
येते येते हूल देते
सर येत नाही
घेते घेते म्हणते तरी
जवळ घेत नाही
अशा वेळी खोट खोट रुसावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत
कुठे जाते कुनासठाउक
वाट उन्च सखल
त्यात पुन्हा सगळीकडे
निसरडीचा चिखल
पाय घसरुन आदळल्यावर ह्सावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत
पाखर जरी दिसली नाहीत
ऐकु येतात गाणी
आभाळ कुठल कळ्त नाही
इतक निवळ पाणी
आपल्या डोळ्यात आपल रूप दिसावस वाटत
ओळीमागुन गाण्याच्या
थरारत जावस वाटत
आभाळतुन रन्गाच्या
भरारत जाव
सुराच्या रानात भुलुन फुलावस वाटत
कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत
आपल आपण एकट असावस वाटत ............
अशी पहिली भेट......
अशी हासलीस तू
तो क्षण गोंधळला होता
अन पुन्हा लाजलीस तू
तेव्हा मोह मला कळला होता
तसे सांगताना तू
हर्ष मनी या भरला होता
डोळ्यांनी पाजलीस फार
रोग मला हा जडला होता
हात सरावा तुझ्याकडे
अन पुन्हा मागे तो वळला होता
नजरेच्या जालीम स्पर्शाने
परवाना हा जळला होता
हात तुझा मज हाती पाहून
स्वच्छ नभही मळला होता
तो तिकडे मी इकडे बरसून
आसमंत हा भिजला होता
शब्द नव्हे तो जगण्याचा अंशच
एक एक मी जपला होता
अशी जवळ तू येता येता
वैशाखवणवा हा सरला होता
जाळं नात्यांच .......
नात्यांच विश्व सरलंय आता
आता उरलय ते फक्त जाळं नात्यांचं
मी सुटु पहातोय यातून कधीचा
पण जितका प्रयत्न करतो
तितकाच अजून गुरफटत जातोय
अजुन समजलो नाही तुझं - माझं नात
कदाचीत, तुही.. नाही समजलीस
आता डोळेही विसरून गेलेत, पाण्यात भिजायचं
तरीही, कधी कधी ओघळतात दोन थेंब
पण अजून समजलो नाही
नातं..
डोळ्यांच आणि अश्रुंच
खरचं नात्यांच विश्व सरलंय आता
उरलंय ते फक्त जाळं नात्यांच
मी आठवन & प्रतिबिंब .........
मी एक गोष्टा पाहतोय काही कवितामध्ये जणू स्त्री-पुरूष नत्वरुन एक मेकांना दोष देणे चालू आहे.
ही कविता काही विचार सप्ष्टा करेल.
मी नेहमी घाई करतो असे ती म्हणायची
पण योग्य वेळ तिलाच शेवटपर्यंत तिला कळलिच नाही.
मी तिच्याबरोबर चालत होतो शेवटपर्यंत
पण वाट ती कधी चुकली तिला कळ्लीच नाही
मी तिचे जणू प्रतिबिंब झालो होतो
पण वास्तवाचा आरसा तिने कधी पहिलाच नाही.
मी दिलेल्या भेटवस्तू ती समोर फेकून गेली
पण आठवन काढून खोटा दोष देणे तिने सोडलच नाही.
मी आता नक्की विचित्र नियतीला मानतो
नशीबापेकषा आधी थोडा माणसाला जाणतो.
आणि दोष देऊन तुला मला जायाच नाहीए
प्रेम केल होत मी तुझ्यावर हे परत परत सांगायाच नाहीए.
दोन क्षण.....
मी पाहिले तुला
तु न् पाहिले मला,
चातकाने किती पाहिली वाट
ढ़ग मात्र न् बरसताच गेला!
कळया नुकत्याच उमललेल्या
पहाटेच्या दवाने न्हालेल्या,
तुज़्या ओन्जळित् हव्या होत्या खरया
पहिल्या मी सन्ध्याकाळि कोमेजलेल्या!
छोटासाच मी एक
खऴाऴता आहे झरा,
पारिजातक वाहण्याची होती आस
पाहिला मी रिक्त सडा!
सूर्यसुध्दा थाम्बलेला
चन्द्राच चान्दण प्यायला,
तुला खरच का वेळ नव्हता
मला दोन क्षण पहायला?
मी कोण् आहे बर?? .......
मी शोधतोय स्वतःहाला माझ्या प्रवासात..
कधी वाटते मीच हरवलोय कुठे तरी
आज इथे अन् उद्या तिथे शोधतोय काही तरी..
मागासलेला असलो तरी मागासलेला नाही
आणि आपल्या माणसांचा असलो तरी आपल्या माणसात् नाही..
बरीच प्रश्न मनाला भेडसावत असतात
हलक्या पावलांनी आलेली स्वप्ने खुणावत असतात..
प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता हल्ली मीच कोड्यात पडतो
राहुदे गड्या म्हणुन मग मीच स्वतःहाची समजुत काढतो...
काय हरवलय विचार करता करता मीच हरवुन बसतो
आणी जुन्या आठवणींची एक छानशी सवारी करुन येतो..
आठवणींच्या कप्यात अजुनही शाळेची पाटी कोरी आहे
अन त्याच बाकावर मित्रांबरोबर बसण्याची ईछा मात्र मनी आहे..
मला एकदा माझ्या शाळेतली सकाळची घंन्टा ऐकायची आहे
शाळेत जातानाची मनाची हुरहुर अनुभवायची आहे..
तोच जुन्या मित्राचा सहवास हवाय मला
शाळेचा एक आभास हवाय मला..
आता या प्रश्नांची उत्तरे शोधावी..की असेच पुढे जावे..
कडु गोड आठवणींसोबत हसावे के रडावे??
तुलाच शोधतोय! .......
अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना....
जेव्हा कधी कोणावर ......
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
Tuesday, February 5, 2008
कधीतरी एकटे असावे असे वाटते...
कधीतरी एकटे असावे असे वाटते...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
त्या वेळी आसपास कोणीही नसावे असे वाटते
आजुबाजुचे रान सारं गप्प गप्प झालेलं असतं
धुक्यानेही रानसारे गच्च गच्च झालेलं असतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
आले आले मी आले करत सर धावतं येते
तुझ्या आठवणींचे पिंपळपान मग मनात दाटुन येते
त्या आठवणींच्या जोरावर पुन्हा उंच उडावंस वाटंत
स्पर्श करुन तारयांना खाली खेचुन आणावंस वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
त्या तिथे आज कुणीही येऊ नये असं वाटंत
अचानक कुठुन तरी आभाळ वर दाटतं
तलावाच्या काठी मग माझं मन भिजु लागतं
पाण्याच्या पार्श्वभुमीवर आपलं इंद्रधनुष्य शोधु लागतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
पाऊस थांबल्यानंतर निसर्गाची रुपे निरखु लागतं
थव्यांसोबत पक्षांच्या मन मात्र उडु लागतं
गवताच्या पात्यांवर पडलेल्या थेंबाप्रमाणे दुःख सारं मग ओसरु लागतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
नाते प्रेमाचे..
नाते प्रेमाचे
या जगात नाही दुसरे
प्रेमाहुन निर्मळ नाते...
पण हेच नाते क्षणात आपुले
जिवन विस्कटून जाते
या नात्याला व्याख्या नाही
थोर सांगून गेले बरे
मात्र ते फार सुंदर असते!
हे विधान आहे खरे.
केव्हातरी मी हि केले होते,
जिवापाड प्रेम एकावर.......
पण, माझ्या प्रेमाला त्याचा
नकार आहे आजवर.
मला दु:ख नाही त्याच्या
नकारार्थी उत्तराचे..
दु:ख वाटते ते त्याच्या
प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि
निव्वळ टाईमपास या शब्दांचे....
त्याला नाही कळला,
माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...
त्याच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,
ते सारे गेले व्यर्थ.
मी त्याच्यावर आजही
मनापासून प्रेम करते,
मनातले प्रेमभाव,
कवितेच्या रुपात वाहते.
कळेल त्याला माझ्या
एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!
फार वेळ झाली असेल...
मैत्री कशी असावी..?
मैत्री कशी असावी?
जी कधीही पुसली न जावी
जशी रेघ काल्या दगडावरची
कोणतही वातावरण पेलवनारी
एखाद्या लवचिक वेलीसारखी......
कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी
कुठेही चमकणार्या हिर्यासारखी
थोड्याश्यावर न भागणारी
दुष्काळात तहाननेल्या मनसासारखी.......
पवित्रतेने परिपूर्ण अशी
देववरचि फ़ुले जशि.....
कधीही न सम्पणारी
विशाल सागरासारखी
सतत बरोबर असावी
शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी....
तुटली तरि कायम आठवणीत असणार्या
आयुष्यातल्या सोनेरी क्षणासारखी...........
मैत्री अशी असावी
प्रत्येक तासाला, क्षणात बदलणारी
मनाला तजेला देणारी
कधीही न मरणारी
तो रस्ता मला पाहून आज हसला...
तो रस्ता मला पाहून आज हसला
तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी
तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही
रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत
पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच
उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज
माझ्या या नजरेची भाषा ...
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,
तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,
येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!
नाती...
नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!!
काही अगदी जवळची,
तर काही अशीच वरवरची...
नाती काही क्षणातच जुळणारी,
तर काही अनेक वर्षातही न जाणवणारी...
काही नात्यांना देता येत नाही नाव,
तरीही ती असतात खूपच खास !
काही नाती ह्रुदयात घर करून रहणारी,
दूर राहूनही कधीच न तुटणारी...
मात्र काही नाती तुटल्यानंतरही,
जन्मभर आठवत राहणारी ........
मैत्री केली आहेस म्हणुन ....
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस
.....
प्रेम केले तुझ्यावर मी..
पण ते खरे होते खोटे नाही,
समज असुन असमज वागलीस,
तुला काहीच कसे वाट्ले नाही........
तुझे असे वागणे देखील,
मला अद्याप काही कळाले नाही,
तु अशी वागलीस खरी,
पण तुला काहीच कसे वाट्ले नाही,
प्रेम या रसाला तु,
अम्रुत समजु शकली नाही,
एवढा पापी विचार करण्यापुर्वी,
तुला काहीच कसे वाट्ले नाही,
जीवनाच्या अखेर सुद्ढा मला प्रेम मीळाले नाही,
मी मेल्यावर लोक काय बोलतील याचे तुला काहीच कसे वाट्ले नाही,
तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस,
तू कशही असलीस तरी आजही माझी आहे,
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही,
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस,
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवाय जगू शकत नाही,
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही,
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी,
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही,
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस,
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस,
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं,
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस?????
आपली मैत्री ..
आयुष्याच्या वेलावर फुललेलं फुल
जसं एक खेळ्कर हसणारे मुल
हिवाळ्यातल्या सकाळचे टपोरे दवबिंदु
नाही त्यात किंतु परंतु
संध्याकाळी आकाशी रंगाची उधळण
भिरभिरत्या मनाला मैत्रीचे कुंपण
झरझर पावसाची आहे सर
झुळझुळणारा झर्याचा हा निर्झर
निष्पाप अशा या मैत्रीची चादर
सतत राहु दे माझ्या अंगावर
उबेत या जीवन सफल माझे
रक्ताचे नाही ह्रुदयाचे नाते तुझे माझे
साजरा करायला मैत्रीचा दिवस हवा कशाला
मैत्रीच साजरी करतो आपण प्रत्येक क्षणाला...
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील ...
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
.jpg)